आकडेबाजी (५): WPR
भारतातील आर्थिक स्थितीसंबंधीची एक तटस्थ आणि वस्तुनिष्ठ समजली जाणारी पाहणी म्हणजे नॅशनल सँपल सर्व्ह, ऊर्फ NSS. यात वेगवेगळ्या अर्थ-सामाजिक थरांमधले भारतीय लोक कशाकशावर किती-किती खर्च करतात, त्यांपैकी किती लोकांना काय दर्जाचा रोजगार मिळतो, वगैरे अनेक बाबी तपासल्या जातात. एरवी या पाहण्या पाचेक वर्षांनी केल्या जातात, परंतु नुकताच हा अवकाश आवळला गेला. २००९-१० नंतर दोनच वर्षांत, …